Pune Shivshahi Bus case 
मुंबई/पुणे

Pune crime : स्वारगेट डेपोत बलात्कार, शिवाजीनगर डेपोचं भयान वास्तव्य, 'साम' रियालिटी चेक

Pune Shivshahi Bus case : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर पुण्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी साम टीव्हीने शिवाजीनगर एसटी बस स्थानकावर रिअॅलटी चेक करण्यात आले.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Pune Swargate/Shivajinagar Shivshahi Bus case : स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी रोजी २६ वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली. स्वारगेट डेपोमध्ये शिवशाहीमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकात साम टीव्हीने रिअॅलटी चेक करत सुरक्षेचा आढावा घेतला. त्यामधून धक्कादायक माहिती उघड झाली. शिवाजी बस स्थानकात अंधार असल्याचे चित्र होते. त्याशिवाय पोलिसही उपस्थित नसल्याचे दिसत आहे.

शिवाजीनगर बस स्थानकात बारा वाजून पंधरा मिनिटांनी एकही पोलीस सुरक्षारक्षक नसल्याचे दिसले. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर गर्दुल्यांचा वावर दिसून आला, त्यांना पाहून अनेक महिलांना भीती वाटत होती. अनेक ठिकाणी लाईट नाही, त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या अन् इतर गुन्हेगारीच्या घटना होऊ शकतात, असे दिसत होतं.

स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या संतापजनक घटनेनंतर आम्ही पुण्यातील शिवाजीनगर बस डेपोमधील रिअॅलटी चेक केले. बारा वाजता शिवाजीनगर बस डेपोच्या बाहेर अनेक बस लावलेल्या पाहायला मिळाल्या. या बसमध्ये चालक आणि वाहक दोन्ही झोपलेले होते. तर बस डेपोच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत प्रवासी झोपलेले दिसले. गर्दुल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, ते लोकांमध्ये फिरताना दिसले...

शिवाजीनगर बस डेपो मध्ये सुरक्षारक्षक व पोलीस दोन्ही पाहायला मिळाले नाहीत. शिवाजीनगर बस डेपोमध्ये जो हिरकणी कक्षा होता तो पूर्ण बंद होता. त्याचबरोबर पोलीस मदत केंद्रही त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. वाजीनगर बस डेपोच्या आणि बसेस लावलेल्या होत्या व वेटिंग कक्ष सोडला तर कुठेही बाहेर लाईट पाहायला मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT