Kishor Aware Case Updates Saam TV
मुंबई/पुणे

Kishor Aware Death Case: खळबळजनक! किशोर आवारेंच्या हत्येचा बदला घेण्याची सुरू होती तयारी; ७ जणांना अटक

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime: पुणे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. ही हत्या का झाली? हे सर्व स्पष्ट झाले आहे. परंतु या प्रकरणील एक धक्कादायक माहिती समोर येत असून या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन रचला जात असल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस पथकाने एकूण सात अट्टल गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकुण 7 देशी पिस्टल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. प्रमोद सोपान सांडभोर, शरद मुरलीधर साळवी, अमित जयप्रकाश परदेसी, अनिल वसंत पवार, अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी आणि देवराज अशी आरोपींची नावे आहेत.

या सात अटल गुन्हेगारांच्या ताब्यातून दरोडा विरोधी पोलीस पथकांने 7 देसी पिस्टल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या सातही आरोपीं विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 भादवी कलम 34 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात याबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जमा केला होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT