Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : 100 रुपये दिले नाहीत म्हणून तरुणाचा हात छाटला; चतुःश्रृंगी भागातील घटना

पुण्यातील आणखी एक धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - 31 डिसेंबर रोजी सर्वत्र नव वर्षाचा जल्लोष सुरु होता मात्र पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत 'हॅपी न्यू इयर' म्हणण्यावरून तसेच शंभर रुपये न दिल्याच्या रागातून तरुणाच्या हातावर कुर्‍हाडीने वार करून हात मनगटापासून तोडल्याचा प्रकार घडला आहे. पुण्याच्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई चौकात ही घटना घडली आहे. (Pune Crime News)

पंकज तांबोळी असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. पंकज हा सीडॅक एसीटीएस या इन्स्टिट्यूटमध्ये डॅक कोर्स करीत आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गौरव मानवतकर याला अटक केली असून, त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी आशुतोष माने आणि त्याचे मित्र पंकज तांबोळी,साजीद शेख हे खानावळ बंद असल्याने साई चौकातील हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. नववर्षाचे स्वागत करून जेवण झाल्यावर रात्री एकच्या सुमारास ते हॉटेलबाहेर उभे असताना मोटारसायकलवरून दोघे जण आले.

ते दारूच्या नशेत जबरदस्तीने 'हॅपी न्यू इयर' म्हणत होते तसेच त्यांनी पंकजकडे जबरदस्तीने शंभर रुपयांची मागणी केली. पंकजने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यामध्ये एका आरोपीने फोन लावून त्याच्या आणखी साथीदारांना बोलवून घेतले. त्याचे साथीदार आल्यावर पुन्हा वाद झाला.

यावेळी पंकजचे थोडा पुढे चालत गेला. तेव्हा त्यालाओरडण्याचा आवाज आला. त्यातील एका आरोपीने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने पंकजचा हात मनगटापासून तोडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी हाताचा पंजा एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरत त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT