Shocking Crime in Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: देवाच्या आळंदीत लाजिरवाणं कृत्य, तरूणीचे अपहरण करून अब्रुचे लचके तोडले, किर्तनकार महिलेनं रचला कट

Shocking Crime in Pune: आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड. महिला कीर्तनकारसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

देवाची आळंदी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरूणीला डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. हा संतापजनक प्रकार आळंदी येथील केळगावातून उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस तपासात या प्रकरणात एका किर्तनकार महिलेचाही सहभाग असल्याचं समोर आलंय. पीडितेनं पाच जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. या घटनेनंतर सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलीस ठाण्यात पत्र देत कारवाईची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

२ जून २०२५ रोजी संतप्त ही घटना घडली. पीडित तरूणी घरात एकटी होती. एक महिला तिच्या खोलीत शिरली. तसेच तिला शेताकडे जाण्याचे सांगून घराबाहेर नेलं. त्यानंतर ती ज्या वाटेवरून जात होती, त्यावाटेवर काळ्या रंगाची चारचाकी आली. त्यात आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एक अनोळखी व्यक्तीसोबत होती. तिघांनी मिळून तिचे जबरदस्ती अपहरण केले. यावेळी तिने स्वत:च्या बचावासाठी आरडोओरड केली. नंतर आरोपींनी तिला अॅसिड टाकण्याची धमकी दिली.

अपहरण करून तिला मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आलं. तिथे पोहोचल्यानंतर आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, किर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे या चोघांनी तिला एका खोलीत डांबून ठेवलं. आण्णासाहेब आंधळे यांनी पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याची माहिती पीडितेनं दिली. या प्रकरणात पीडितेनं शेवगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, वाहनचालक, सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार, धमकी आणि जबरदस्तीने लैंगिक शोषण या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Tourism: दादरपासून हाकेच्या अंतरावरील hidden पर्यटनस्थळं; वन डे ट्रिपसाठी परफेक्ट प्लॅन

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

SCROLL FOR NEXT