Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात दोन तरुणांनी चोरल्या तब्बल १६ गाड्या; फक्त RX 100 बाईक चोरायचे अन्...

नुकतेच मिसरूढ फुटलेले या तरुणांनी अजून किती गाड्या चोरल्या आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून आर. एक्स १०० यामाहा दुचाकी चोरणाऱ्या सराईतांकडून तब्बल १६ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बाजारात सहज उपलब्ध नसल्याने हे दोघे ही तरुण ही गाडी चोरायचे आणि जास्त किमतीला विकत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, नव्वदीच्या दशकातील तरुणांचे पहिलं प्रेम, तरुणांच्या मनात रुतून बसलेली आणि जिच्या आवाजाने सर्वांनाच भुरळ घातलेली गाडी म्हणजे "आर. एक्स १०० यामाहा". आताच्या लाखों रुपयाच्या गाड्या घेऊन फिरण्यात देखोल इतकी शान वाटत नसेल तितकी त्यावेळी तरुणांना आरएक्स-१०० घेऊन फिरण्यातच शान वाटायची, कॉलेजचे तरुणाईचे तर आरएक्स-१०० चे विशेष आकर्षण होते ,मात्र कालांतराने ही गाडी बंद झाली.

सध्या ही गाडी मार्केटमध्ये मिळत नसली तरी सुद्धा अनेक जण ही गाडी कुठून मिळेल का हे शोधत असतात. अशातच आता पुणे पोलिसांनी (Pune Police) आरएक्स-१०० चोरी करणाऱ्या २ तरुणांना पकडले आहे. दोघांनी आत्तापर्यंत फक्त आर. एक्स १०० यामाहा दुचाकी चोरल्याचे तपासातून समोर आले आहे. या गाड्या सध्या बाजारपेठेत मिळत नसल्यामुळे या गाड्या अधिक किमतीने विकून हे दोघे फायदा करून घ्यायचे.

दरम्यान, पुणे शहरात (Pune News) वाढत्या दुचाकीचोरी प्रकरणाचा तपास सुरू केला असता पोलिसांनी तब्बल ४४० सीसी टिव्हीची मदत घेत तसेच मोटारसायकल चोरी झालेल्या भागातील दुचाकी मोटारसायकलचा शोध घेत असताना त्यांना हे दोन्ही आरोपी आढळून आले आणि त्यांच्याकडून एक धक्कादायक माहिती मिळाली. आदित्य दत्तात्रय मानकर आणि मयूर ऊर्फ भैय्या पांडुरंग पवार असे या आरोपींचे नावे आहेत.

त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ४.५० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या १७ मोटारसायकल जप्त केल्या असून १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गाडीचे प्रेम आणि ती विकून भरपूर पैसे कमावण्याच्या मोहात नुकतेच मिसरूढ फुटलेले या तरुणांनी अजून किती गाड्या चोरल्या आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

Ayurveda Health Care: शिळं अन्न खाताय? ३ तासातच होतील आरोग्यावर परिणाम; आयुर्वेदाचा इशारा

Navratri Fasting Tips: नवरात्रीचा उपवास सोडताना काय खावे अन् काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT