Pune Crime News, Pune City police  SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : लष्कराच्या जवानाचं भयंकर कृत्य, वाहतूक पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, ICU मध्ये दाखल

Pune Crime : दीड महिन्यापूर्वी दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना केलेल्या दंडात्मक कारवाईमुळं रागातून सैन्यदलातील जवानानं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला.

Saam Tv

सचिन जाधव, पुणे

Pune Crime Latest News :

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. दीड महिन्यापूर्वी दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना केलेल्या दंडात्मक कारवाईमुळं रागातून सैन्यदलातील जवानानं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. दीड महिन्यापूर्वी दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असल्यानं संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं दंडात्मक कारवाई केली होती. याचा राग मनात धरून सैन्यदलातील जवानाने वाहतूक पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉकने प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील बुधवार चौकात बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. रमेश ढावरे हे फरासखाना वाहतूक विभागात कार्यरत आहेत. वैभव मनगटे (वय २५, मंगरूळ, छत्रपती संभाजीनगर) असं ढावरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मनगटे हा सैन्यदलात कार्यरत आहे. (Crime News)

नेमकं काय झालं?

पोलिसांच्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस रमेश ढावरे ४ सप्टेंबरला बुधवार चौकात तैनात होते. वाहतूक नियमन करत असताना ढावरेंनी दुचाकीवरून आलेल्या मनगटेविरुद्ध ट्रिपल सीट जात असल्यानं दंडात्मक कारवाई केली होती. त्यावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली होती. याबाबत शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नोंदही केली होती.

या कारवाईचा राग मनगटेच्या मनात होता. त्याने बुधवारी संध्याकाळी अचानक ढावरे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने प्रहार केला. मनगटेने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला. मनगटेला शनिवारवाड्याजवळ पकडले. या हल्ल्यात ढावरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मनगटेविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पोलीस कर्मचारी पंकज भोपळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी वैभव मनगटेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

Karjat Tourism : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

Coconut Truffles: न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रथमच मनसे-महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकत्र

SCROLL FOR NEXT