Mumbai Crime News: संतापजनक! धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, आरडाओरड केल्यानंतर...

Mumbai Local Train Crime News: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवासी महिलेचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग करण्यात आला
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSAAM DIGITAL

Mumbai Local Train Crime News

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवासी महिलेचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी २७ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या लोकलमध्ये एका २७ वर्षीय तरुणाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. मध्य रेल्वेवर डोंबिवली ते घाटकोपर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Prime Minister Narendra Modi : मोदींच्या पुणे दौऱ्यावरून वाद.. ; पाहा व्हिडीओ

पोलिसांनी या घटनेबाबत बुधवारी ही माहिती दिली. डोंबिवली-घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local Train) सोमवारी संध्याकाळी हा संतापजनक प्रकार घडला. ३५ वर्षीय महिला (Woman) पतीसोबत लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी या तरुणाने तिचा विनयभंग केला.

हरिश असं संशयित आरोपीचं नाव आहे. तो विक्रोळी (Vikroli) येथील रहिवासी आहे. लोकलच्या ज्या डब्यातून महिला प्रवास करत होती, त्याच लोकलच्या डब्यात डोंबिवली येथे आरोपी चढला. प्रवासादरम्यान त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला.

महिलेने या प्रकारानंतर आरडाओरड केली. त्यानंतर तिच्या पतीने आणि इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली. आरोपीला पकडून त्यांनी घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. (Crime News)

Mumbai Crime News
Narendra Modi News | Sydney मध्ये Prime Minister Narendra Modi यांची भारताबद्दल मोठी घोषणा

पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, हे प्रकरण डोंबिवली रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. अटकेनंतर आरोपीने कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, कोर्टाने तो नामंजूर केला. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Mumbai Crime News
Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : 'गणेश' च्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेमुळे विखेंची अडचण वाढली; थाेरात गटात चैतन्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com