Amabarnath Crime News: बायको, सासरा आणि मेहुणा घरी आला; वादानंतर जावयासोबत घडलं भयंकर

Ambarnath Crime News: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भयंकर घटना घडली आहे.
 Ambarnath Crime News
Ambarnath Crime NewsSAAM DIGITAL

Ambarnath Crime News

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भयंकर घटना घडली आहे. सासरी नांदायला का घेऊन जात नाही, याचा जाब विचारण्यासाठी आलेली तरुणी, तिचे वडील, काका आणि भावाने तरुणावर वार केले. यात त्याच्या डोक्याला आणि गुप्तांगाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या वडिलांना अटक केली आहे.

 Ambarnath Crime News
Woman Climbs Electricity Tower: बापरे! बॉयफ्रेंडसोबत कडाक्याचं भांडण झालं; तरुणी रागाच्या भरात हायटेन्शन टॉवरवर चढली अन्...

या घटनेबाबत पोलिसांनी (Police)बुधवारी माहिती दिली. त्यानुसार अंबरनाथमध्ये (Ambernath) मंगळवारी रात्री ही घटना घडली. जखमी तरुणावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तरूण आणि आरोपी महिलेचे लग्न १० वर्षांपूर्वी झाले होते. अंबरनाथमधील कमलाकर नगर परिसरात ते राहत होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद (Family Dispute) होऊ लागले. त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पत्नीसह सासरे, चुलत सासरे आणि मेहुणा त्याच्या घरी आले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. (Crime News)

 Ambarnath Crime News
Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News : 'गणेश' च्या निवडणुकीत कोल्हेंच्या भूमिकेमुळे विखेंची अडचण वाढली; थाेरात गटात चैतन्य

बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झाले. पत्नी, चुलत सासऱ्यांनी तरुणावर सळई आणि धारदार शस्त्राने वार केले, असा आरोप पीडित तरुणाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यावर आणि गुप्तांगावर जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

 Ambarnath Crime News
BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणेंना दिलासा कायम; पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com