Woman Climbs Electricity Tower: बापरे! बॉयफ्रेंडसोबत कडाक्याचं भांडण झालं; तरुणी रागाच्या भरात हायटेन्शन टॉवरवर चढली अन्...

Woman Climbs Electricity Tower: छत्तीसगडमध्ये एक प्रियकर आणि प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना घडली आहे. दोघे हायटेन्शन टॉवरवर चढल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
Woman Climbs Electricity Tower
Woman Climbs Electricity TowerSaam tv
Published On

Raipur News: छत्तीसगडच्या पेंड्रा जिल्ह्यातून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्तीसगडमध्ये एक प्रियकर आणि प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना घडली आहे. दोघे हायटेन्शन टॉवरवर चढल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

छत्तीसगडच्या पेंड्रा जिल्ह्यातील कोडगार गावातील ही घटना आहे. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये किरकोळ गोष्टीवरून कडाक्याचे भांडण झालं, त्यानंतर प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढली. नाराज झालेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी प्रियकरही हायटेन्शन टॉवरवर चढला. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. यामुळे गावकऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता पोलिसांना माहिती दिली.

Woman Climbs Electricity Tower
London Street Viral Video: लंडनमधील रस्त्यावर तरुणानं गायलं ९०च्या दशकातील प्रसिद्ध गाणं; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

दोघे खाली उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या दोघांच्या कृत्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

पेंड्रा पोलीस ठाण्याच्या कोडगार गावात प्रियकर आणि प्रेयसीमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाले. यानंतर प्रेयसी अनिता ही नाराज होऊन घरी गेली. त्यानंतर घराजवळील हायटेन्शन टॉवरवर चढली. त्यावेळी गावकऱ्यांची नजर तरुणीवर गेली. त्यानंतर तिला खाली उतरण्यास सांगितलं. तरुणी हायटेन्शन टॉवरवर चढल्यानंतर गावातील अनेक लोक जमा झाले.

Woman Climbs Electricity Tower
Pune Metro Viral Video: पुणेकरांचा नाद नाही करायचा! काकाने चक्क हात दाखवून मेट्रो थांबवली, व्हिडिओ व्हायरल

प्रियकराने काढली तरुणीची समजूत

तरुणीचा प्रियकर मुकेश देखील तिला समजविण्यासाठी टॉवरवर चढला होता. प्रियकराने बराच वेळ समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे दोघे खाली उतरले. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेले. तत्पूर्वी, पेंड्रा गावातील पोलिसांनी या दोघांची समजूत काढून सोडून दिले. दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरून वाद झाल्यानंतर दोघे टॉवर चढले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com