Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात चालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला 50 मीटरपर्यंत फरफटत नेले, परिसरात खळबळ

पुण्यात कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या जीवघेण्या प्रसंगात बचाव करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बोनेटवर उडी मारल्यानंतही चालकाने फरफट नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) खडकी परिसरातील ही घटना आहे. पुण्यात पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच बचाव करण्यासाठी वाहतूक पोलिसाने बोनेटवर उडी मारली. मात्र, तरीही मुजोर चालकाने वाहतूक पोलिसाला कारवरून बसवून फरफटत नेले.

खडकी पोलीस (Police) ठाण्यासमोरील चर्च चौकात शुक्रवारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी चालक सूरज जाधवला अटक केली आहे. गणेश रबडे हे वाहतूक नियमन करत असताना कारचालकाची मुजोरी समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलीस गणेश रबडे हे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी कारचालक सूरज जाधव (वय २९) याने वाहतूकीच्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे वाहतूक पोलीस गणेश रबडे यांनी कारचालक सूरजला कार थांबविण्यास सांगितले. मात्र, या मुजोर सूरजने थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला.

वाहतूक पोलिसाने बचाव करण्यासाठी मुजोर कारचालकाच्या कारच्या बोनेटवर उडी मारली. मात्र, तरीही मुजोर चालकाने वाहतूक पोलिसाला कारवरून बसवून ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता घडली. या प्रकरणी सूरज जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज जाधववर भारतीय दंड संहित ३५३, ३३२ आणि ३३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT