Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: मोबाईल, दागिने सोडून नको त्या गोष्टीची झाली चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Theft of shoes in Pune: चोरट्याने केलेली चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Ruchika Jadhav

अक्षय बादवे, पुणे

Pune Theft News: पुण्यामधून चोरीची एक अजब घटना समोर आली आहे. आजवर तुम्ही मोबाईल, दागिने, नोटा अशा गोष्टी चोरल्याचं ऐकलं असेल. मात्र पुण्यातून चक्क एक चप्पल चोरल्याची घटना समोर आली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Theft of shoes)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल ५५ चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी लंपास केलेत. तीन जणांनी मिळून ही चोरी केली आहे. चोरट्यांनी ३० ते ४० हजार रुपयांचे ५५ चप्पलांचे जोड चोरी केलेत. यातील ४० मेन्स शूज तर १५ लेडीज चपलांचे जोड चोरट्यांनी चोरले आहेत.

हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात फिर्याद दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला. नंतर हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल (Shoes) असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करून पसार झाले.

अशिक्षित असल्यामुळे या तरुणांनी उदरनिर्वाह तसेच दारू पिण्यासाठी ही चोरी (Theft) केल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे. खडकी पोलिस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT