Ravindra Dhangekar Saam TV
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar: 'हत्या, कोयता गँगचा विषय गंभीर, भाजपकडून गुन्हेगारांना राजकीय आश्रय..' रविंद्र धंगेकरांचे गंभीर आरोप

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी|ता. ७ जानेवारी २०२४

Sharad Mohol Death Case Update:

पुण्यामध्ये शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. भरदिवसा घडलेल्या गँगवारने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. शहरात कोयता गँगचा वाढता धुमाकूळ, मारामाऱ्या असे प्रकार वारंवार समोर येत असतानाच आता भरदिवसा गँगवारचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाल्याने परिसरातील नागरिकही भयभीत झाले आहेत. या हत्याकांडानंतर कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

"पुणे शहरात खूनाचे सत्र आणि कोयता गँगचे विषय गंभीर होत चालला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात एका गुन्हेगाराची हत्या झाली. या घटनेने कोथरुड परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत... असे रविंद्र धंगेकर म्हणाले. तसेच या प्रकरणी उद्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांनी लक्ष घालावे..

"गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर भाजपने गुन्हेगारांना राजकीय आश्रय देवू नये. चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरवरून आले आहेत. ते थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत. विधान सभेनंतर ते पुणे शहरातून जाणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांनी लक्ष घालावे.." अशी मागणीही धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) यावेळी केली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हेगारांना राजाश्रय..

यावेळी बोलताना रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले. "माझ्या निवडणुकीमध्ये गुन्हेगारी टोळ्या दादागिरी करत होत्या. गुन्हेगार भाजपच्या बाजूने काम करतात. भाजपने गुन्हेगारांना राजकीय आश्रय देणे थांबवावे आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी.." असे रविंद्र धंगेकर म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT