Pune Sadashiv Peth Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून गंभीर दखल; पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना

Sadashiv Peth Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. मंगळवारी पहाटे १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात तरुणीसोबत तिचा आणखी एक मित्र जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलं.

या घटनेनं पुणे (Pune Crime News) शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची आता महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. संबंधित घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे, पीडितेवर रूग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, असं ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

पुणे पोलिस (Police) आयुक्त वैयक्तिक तपासात लक्ष देत असून ,घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना आयोगाच्या वतीने दिल्या आहेत .आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत, असंही रुपाला चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सदाशिव पेठेत थरार, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून कॉलेजला निघाले होते. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात ते आले असता, अचानक शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) हा त्यांच्या दुचाकीला आडवा झाला. काही कळण्याच्या आत शंतनू याने बॅगेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार (Crime News) करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला. त्यानंतर शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. दरम्यान, परिसरातील स्थानिकांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत तरुणीचा जीव वाचवला.

स्थानिकांनी आरोपी शंतनूला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. पुण्यात भरदिवसा एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: - नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणे हेच निवडणूक आयोगाचे मोठे फेल्युअर- शशिकांत शिंदे

SCROLL FOR NEXT