लोणावळ्यानजीकच्या विसापूर किल्ला परिसरामध्ये एका पोलिसाने ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेपाठोपाठ राजगुरूनगरमध्येही दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनेने पुणे हादरले. याप्रकरणावरून आता नागरिक संतप्त झाले आहेत.
राजगुरूनगरमध्ये संतप्त नागरिक आंदोलन करत आहेत. या दोन्ही घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्याचे पोलिस अधिक्षक पंकज देखमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राजगुरूनगरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून अशी माहिती दिली.
पोलिस अधिक्षकांच्या भेटीनंतर रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, '२५ तारखेला ज्या घटना पुणे जिल्ह्यात घडल्या त्या दोन्ही घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. राजगुरूनगरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. याप्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल. राज्य महिला आयोगाकडून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी आम्ही करू. राजगुरूनगर आणि लोणावळ्यात घडलेल्या घटना या भयंकर आहेत. समाजात विकृती वाढत चालली आहे. '
राजगुरूनगरच्या घटनेबद्दल बोलताना रूपाली चाकरण म्हणाल्या की, 'पोलिस प्रशासन अणि शासनाने या दोन्ही घटनांमध्ये चांगल काम केलं आहे आणि करत आहेत. राजगुरूनगर प्रकणारतील आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा आहे. ९ वर्षांपासून तो तिथं राहत होता. तो त्यांच्या ओळखीचा होता. पोलीसांनी यात चांगली कामगिरी करत आरोपीला अटक केली आहे. रात्री ११.४५ रोजी मृतदेह आढळून आले होते. अवघ्या ४ तासांत आरोपीला अटक केली आहे. आरोपींवर अनेक कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कुटुंबाला राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य दिलं जाईल.'
लोणावळ्यातील घटनेबद्दल बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, 'आरोपी सचिन सस्ते २ महिन्यापूर्वी पोलिस खात्यात आले होते. गडावर ख्रिसमसच्या दिवशी त्याची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. ज्या मुलीवर अत्याचार झालं त्या मुलीच्या कुटुंबाचं हॉटेल आहे. आरोपीने ८ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला आहे. आरोपीला पोलिस खात्यातून बडतर्फ करत आरोपीला अटक केली आहे.'
पुण्याचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, 'लोणावळा घटनेत पोलिस कर्मचाऱ्याला आम्ही निलबित केलं आहे. त्याची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे. दुसरी घटना राजगुरूनगरमधील असून आरोपीला ३ ते ४ तासांत अटक केली आहे. आज त्या आरोपीला खेडच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्या आरोपीच्या विरोधात स्ट्रॉंग चार्जशीट दाखल करणार आहोत. नातेवाइकांचा भावनिक उद्रेक होणं साहजिकच आहे. त्यांना मनोधर्य योजनेतून मदत दिली जाणार आहे.'
तसंच, 'आजचा बंद असला तरी सर्वत्र शांतता आहे. कायदा आणि सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी आम्ही प्रयन्तशील आहोत. आरोपी जरी पश्चिम बंगालचा असला तरी तो खूप वर्षांपासून इकडे राहतो. खेडच्या आरोपीची १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी आम्हाला मिळाली आहे. नागरिकांनी आपल्याकडे भाडेकरू रहातात त्याची माहिती पोलिस प्रशासनाला देणं अपेक्षित आहे.', असे पंकज देशमुख म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.