Pune Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime News : उच्चभ्रू सोसायटीतून ३० लाखांच्या ३० सायकली चोरल्या; कारण एकदा ऐकाच, पोलीसही चक्रावलेत

Pune News : पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागात उच्चभ्रू सोसायटी सोसायट्यांमधून अनेक सायकली चोरीला जात होत्या. अखेर पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३० लाख किंमतीच्या ३० सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Sandeep Gawade

चोर दरोडे घालतात, चोऱ्या करतात ते पैसे मिळवण्यासाठी आणि त्यातून मौजमजा करण्यासाठी. मात्र पुण्यातील वारजे पोलिसांनी आज अटक केलेल्या चोरट्यांची गोष्ट थोडीशी वेगळीच आहे. पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत घडणाऱ्या घटनांमुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभे राहिलं होतं. अखेर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं. पण या दोघांचे कारणामे ऐकून पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे.

पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे भागात उच्चभ्रू सोसायटी सोसायट्यांमधून गेल्या काही दिवसांपासून महागड्या सायकली गायब होत होत्या. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत होते. नागरिकांच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात येत होत्या. सायकली कोणतरी चोरी करत असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे गेले काही दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. एक दिवस याच प्रकरणांचा तपास करत असताना दोन तरुण हे कृत्य करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलिसांनी सापळा रचून या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव अशी या चोरट्यांची नावं आहेत. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ३० सायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. तब्बल ३० लाखांच्या या सायकली होत्या. एका सायकलची किंमत जवळपास एक लाख रुपये आहे. सुरुवातीला गुन्ह्याची कबुली देण्यास त्यांनी नकार दिला. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच पटापट उत्तर द्यायला सुरुवात केली.

आता इतक्या महागड्या सायकली म्हणजे त्या चोरून विक्री केली असेल, असंच वाटलं असेल. पण खरं कारण ऐका, केवळ आणि केवळ मौजमस्तीसाठी हे दोघं एक एक लाखाच्या सायकली चोरत होते. एका सोसायटीमधून सायकल चोरायची, मजा लुटून कोणत्यातरी भागात ती सायकल सोडून द्यायची आणि पुन्हा नवीन सायकल चोरायची. कित्येक दिवस त्यांचा हा प्रकार सुरू होता. मात्र या प्रकारांमुळे उच्चभ्रू सोसोयटींमध्ये दहशद पसरली होती. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान त्या दोघांनी अजून कोणत्या भागात सायकली चोरल्या आहेत याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Luckiest zodiac signs: आज कोणाच्या जीवनात येणार शुभवार्ता? पंचांग आणि ग्रहयोग देतायत मोठं संकेत!

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

SCROLL FOR NEXT