Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्याच्या उद्योजकाला ४ कोटींना फसवणाऱ्या 'गुढिया'चं गूढ उकललं, १० महिन्यांपासून होती गायब

Pune Police: या सायबर क्राईमप्रकरणी पुणे पोलिसांनी सानिया सिद्दीकी उर्फ गुढीयाला अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते. पण ती पोलिसांच्या ताब्यातून पळून गेली होती.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील उद्योजकाला ४ कोटींचा गंडा घालणारी गुढियाला अटक करण्यात यश आले आहे. गेल्या १० महिन्यांपासून ती गायब होती. अखेर बिहारमधून तिला अटक करण्यात आली. पुणे सायबर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या गुढियाला बिहारमधून पुण्यात आणण्यात आले आहे. सानिया सिद्दीकी उर्फ गुढीया असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांच्या तावडीतून ती फरार झाली होती. याप्रकरणी ६ पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते.

सायबर पोलिस विभागाच्या पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील नामांकित बिल्डरचा नंबर वापरत, स्वतः बिल्डर बोलतोय असे भासवत 'मी परदेशात आहे, काही पैसे पाठव' असे संबंधित कंपनीच्या अकाउंटंला सांगितले होते. अकाउंटंट यांनी विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाऊंटवर ४ कोटी रुपये पाठवले होते.

या सायबर क्राईमप्रकरणी पुणे पोलिसांनी सानिया सिद्दीकी उर्फ गुढीयाला अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते. मात्र पुण्यात येत असताना तिने पळ काढला. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या १० महिन्यांपासून पोलिस या गुढियाचा शोध घेत होते. अखेर तिला अटक करण्यात यश आले.

गुढीयाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे सायबर पथक दिल्लीत गेले. त्या ठिकाणी त्यांना ती बिहारमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने थेट बिहार गाठलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल २ दिवस पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला आणि गोपालगंज या गावातून गुढीयाला अटक केली. तिला आता पुण्यात आणण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उंड्री,जगदंब भवन मार्ग, मार्वल आयडियल सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर आग

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; आर्यन खानच्या सिरिज विरुद्ध याचिकेत कोर्टानं फटकारलं, सांगितलं...

Mumbai Shocking : तरुणी ३ महिन्यांपासून बेपत्ता; पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड, कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली

Mumbai To Aklola Travel: मुंबई ते अकोला प्रवास कसा करायचा? बस, ट्रेन, कार आणि फ्लाइट पर्याय

Crime: वहिनीसोबत अनैतिक संबंध, तरुणाकडून सख्ख्या भावाची हत्या; डोक्यात दगड घालत घेतला जीव

SCROLL FOR NEXT