pune news  Saam tv
मुंबई/पुणे

पुणे महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा संतापजनक प्रताप; कॉलेजसमोर कारमध्ये बसून करायचा अश्लील कृत्य, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

pune news : पुण्यात कॉलेजसमोर कारमध्ये बसून अश्लील कृत्य करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Vishal Gangurde

पुण्यात महिला नगरसेविकेची तक्रार

महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाचे अश्लील कृत्य

पोलिसांत गुन्हा दाखल

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात संतापजनक प्रकार घडला आहे. महाविद्यालयाच्या बाहेर मुलींकडे बघून अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला नगरसेविकेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाला अटक केली.

महापालिका अधिकाऱ्याचा मुलगा हा महाविद्यालयाच्या बाहेर वाहनात बसून मुलींकडे बघून अश्लील कृत्य करायचा. त्याच्या असा प्रताप करण्याची दुसरी वेळ आहे. प्रणव केदार वझे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी वझे याचे वडील पुणे महापालिकेत कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवने अश्लील कृत्य ४ मार्च रोजी दुपारी १२.४५ वाजता पुण्यातील नामांकित महाविद्यालयाच्या बाहेर केले. आरोपी प्रणव हा वारंवार शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयाच्या आवारात कारमध्ये बसायचा. त्यानंतर पँट गुडघ्यापर्यंत काढून समोर मोबाइल धरून मुलींकडे बघत अश्लील चाळे करायचा. पुणे महापालिकेतील भाजप महिला नगरसेविकेने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

महापालिका अधिकाऱ्याच्या मुलाने हा प्रताप यापूर्वी देखील काहीवेळा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचे वडील पुणे महापालिकेतील पथ विभागात कार्यरत आहेत. भाजप नगरसेविकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रणवच्या मुसक्या आवळल्या.

पालिका अधिकार्‍याच्या मुलाच्या कृत्याने कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरुणाला अटक केल्यानंतर कॉलेज परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे. कॉलेजसमोर संतापजनक प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT