Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Crime News: धक्कादायक! फरशीवर डोके आपटून सुनेचा खून, महिला दिना दिवशीच पुणे हादरले

एकीकडे महिला दिन साजरा केला जात असतानाच पुण्यातील या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: आज ८ मार्च (Womens Day 2023). जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरकाम जमत नसल्याचा आरोप करुन सासूने सुनेचे डोके फरशीवर आपटून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सासूला अटक केली आहे. महिला दिना दिवशीच या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रितू रवींद्र माळवी (वय २८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे मृत महिलेचे नाव असून तिला घरकाम करत नसल्याचा तसेच मुलाचा सांभाळ करत नसल्याने तिची सासू वारंवार छळ करत होती. काही दिवसांपूर्वी स्वयंपाकघरातील फ्रीज उघडताना रितूचा पाय लागल्याने वाद झाला होता. त्यावेळी रितूने सासूसोबत (कमला प्रभुलाल माळवी (वय ४९) वाद घातला. (Crime News)

यावेळी कमलाने रितूला मारहाण केली. तिचे डोके फरशीवर आपटले. यामध्ये रितूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. महिला दिना दिवशीच समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.... (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT