PUNE SHOCKING CRIME: MINOR KILLS FRIEND WITH STONE AFTER DISPUTE IN MUNDHWA Saam tv
मुंबई/पुणे

Pune : आईला शिवी घातली म्हणून संतापला, मित्रानेच केली मित्राची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News : पुण्यातील मुंढवा परिसरात आईला शिवी दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यपानादरम्यान झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील मुंढवा परिसरात मित्राचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

  • मद्यपानादरम्यान झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडली.

  • आईबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून आरोपीने हल्ला केला.

  • मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील मुंढवा परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. आईबद्दल अपशब्द वापरल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश ठेंबरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो सध्या घोरपडी मुंढवा परिसरात राहत होता. ही घटना काल रात्री सुमारे १२.३९ वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री नगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव येथील एका मोकळ्या मैदानात घडली. लोकेश आणि अल्पवयीन आरोपी हे दोघे मित्र होते. घटनेच्या वेळी ते मैदानात बसून मद्यपान करत होते.

दरम्यान, नशेत दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादादरम्यान लोकेश याने आरोपीच्या आईबद्दल शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. आईचा अपमान सहन न झाल्याने आरोपीचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने जवळच पडलेला मोठा दगड उचलून लोकेशच्या डोक्यात जोरात मारला. गंभीर जखमी झालेल्या लोकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, क्षणिक रागातून घडलेल्या या प्रकारामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. मुंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नेमका वाद कशामुळे झाला, याचाही शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

Ratnagiri: गावठी बॉम्बच्या स्फोटाने रत्नागिरी पुन्हा हादरली, १३ वर्षीय मुलाच्या हाताची बोटं तुटली

कर्जतहून पनवेलला अवघ्या काही मिनिटांत पोहोचणार; नव्या रेल्वे मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची 3 ठिकाणी घेतली झाडाझडती

तुम्हाला लागलीय का RBI ची लॉटरी? RBIची 'लॉटरी' लागल्याचा ईमेल आलाय?

SCROLL FOR NEXT