Software Engineer Arrested After Girlfriend's Killed 
मुंबई/पुणे

दुसऱ्या प्रेमसंबंधाचा संशय अन् भयंकर शेवट! हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची हत्या

Pune Crime : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील संशयातून कोमल डहाळे या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

Bharat Jadhav

पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक धक्कादायक घटना घडलीय. प्रेमसंबंधांच्या संशयातून झालेल्या वादातून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणानं आपल्या प्रेयसीची हत्या केलीय. कोमल डहाळे (मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर आरोपी प्रियकराचं नाव शुभम ज्ञानेश्वर कालबांडे (मूळ रा. बुलढाणा) असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, कोमल डहाळे विप्रो कंपनीत तर आरोपी प्रियकर हा इन्फोसीस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. ते गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबीयांची संमती होती. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये गेल्या काही काळापासून वारंवार खटके उडत होते. घटनेच्या दिवशी दोघेही जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते.

जेवण केल्यानंतर हॉटेलवरून पीजीवर परतल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या गंभीर मारहाणीत कोमल बेशुद्ध पडली त्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, मारहाणीत कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. त्यानंतर सकाळी त्याने स्वतः 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! २६ नोव्हेंबरपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

Carrot Differnce: लाल गाजर की नारंगी गाजर? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोघांमधील ७ फरक

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग|VIDEO

Morning Phone Checking: सकाळी डोळे उघडताच मोबाईल चेक करता? मेंदूवर होऊ शकतो परिणाम; आजच बदला ही सवय!

Toll Collection : टोल प्लाझावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा होणार कमी? केंद्र सरकारकडून फास्टॅगनंतर नवीन MLFF प्रणाली सुरू

SCROLL FOR NEXT