Pune Koyta Gang Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात कोयता गँगची दहशत संपेना, तरुणावर जीवघेणा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Pune Koyta Gang: पुण्यात आणखी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने या तरूणावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिस कारवाई करत असताना देखील कोयता गँग भररस्त्यात, भरदिवसा हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अनेक पुणे शहर आणि उपनगरातून समोर येत आहेत. अशामध्ये पुण्यात आणखी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने या तरूणावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोलीत ही घटना घडली आहे. वाघोलीच्या बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत चार तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या गुंडांनी कोयत्याने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

एक तरुण खाऊ गल्लीतून जात असताना त्याला या चार जणांच्या टोळीने गाठले. सोबत आणलेल्या कोयत्याने या टोळीने तरुणावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान या टोळीने तरुणावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर पोस्ट करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'कसाय मग धप्पा', असं या व्हिडीओवर लिहिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हल्लेखोर तरुणांनी हल्ल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रावर रील तयार करून पोस्ट केला. हे सर्व हल्लेखोर अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या तरुणांचा पोलिस शोध घेत आहे. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणांनी हा हल्ला का केला? यामागचे कारण अद्याप समजले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT