Pune Latest News Saamtvnews
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! शोरूमध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; तब्बल २१ गुन्हे उघडकीस

Pune Latest News: या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरात मोटारींच्या शोरूममध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मुंबईतून अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या टोळीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात २१ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या (Pune) बिबवेवाडी येथील एका मोटर्स शोरुममधून चोरट्यांनी चार लाख ९६ हजार रुपयांची रोकड चोरी केली होती. तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असाच प्रकार घडला होता. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासावेळी पोलिसांनी एका संशयित मोटारीच्या मालकाचे नाव आणि पत्ता शोधला.

चौकशीमध्ये ही मोटार जळगाव (Jalgaon) येथील असून तीन वर्षांपूर्वी जळगावमध्ये अशा प्रकारच्या सहा घटना घडल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या चोरट्यांची माहिती काढली. त्यांचा पाठलाग करीत पोलिस नवी दिल्ली, मथुरा, हरिद्वारला गेले. चोरटे मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांना बांद्रा रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले.

सावन दवल मोहिते (वय १९, रा. दहिखेड, जि. अकोला), बादल हिरालाल जाधव (वय १९, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव), सोनू नागुलाल मोहिते (वय २२, रा. विचवा, जि. जळगाव), अभिषेक देवराम मोहिते (वय २०), जितू मंगलसिंग बेलदार (वय २३, दोघे रा. धानोरा, जि. जळगाव) आणि पिंटू देवराम चौहान (वय १९, रा. इंदूर, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कष्टाला पर्याय नाही, ५ राशींसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Saam Maha Exit Poll: शिर्डी नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? संभाव्य नगराध्यक्ष कोण? पाहा Exit Poll

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

SCROLL FOR NEXT