Rain Update in Maharashtra : राज्यात 11 जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक, हवामान विभागचा अंदाज टेन्शन वाढवणारा

Rain Stats in Maharashtra : पुढील काही दिवसात पावसाचं प्रमाण आणखी घटण्याचा अंदाज आहे.
Farmers
FarmersSaam TV
Published On

Maharashtra Rain News : राज्यभरात यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे. अनेक भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ज्या भागात सुरुवातीला पाऊस झाला तिथे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उभी पिकं करपली आहे.

राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती असताना येत्या काही दिवसांतही काहीही दिलासा मिळणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसात पावसाचं प्रमाण आणखी घटण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 25 टक्क्यांनी कमी पाऊस पडला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. (Latest News Update)

Farmers
Chandrayaan 3 Update : चांद्रयान-३ च्या लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास काय? इस्रोचा 'प्लान बी' आला समोर

संपूर्ण राज्यभरात आतापर्यंत 7 टक्क्यांनी मान्सूनच प्रमाण घटलं आहे. पालघर, ठाणे, मुंबई व नांदेड वगळता संपूर्ण राज्यभरात पावसाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

पुढील चार ते पाच दिवसात राज्यभरात पावसाचे प्रमाण आणखी घटणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागील पाच वर्षात ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.

Farmers
Farmer Success Story: कर्टुल्याने केलं लखपती! 3 महिन्यातच शेतकरी झाला मालामाल; संघर्षगाथाही तेवढीच मोठी

आज हवामान कसं असेल?

आज विदर्भातील काही भाग आणि घाट भागात अंशतः ढगाळ वातावरण आसेल. मोठा पाऊस कुठेही अपेक्षित नाही. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com