Crime News
Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बादवे

Pune News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह त्याच्या सासू-सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

पती-पत्नीच्या नात्यात सातत्याने वाद आणि रुसवे फुगवे येत असतात. अशात अनेक ठिकाणी पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून महिलेचा छळ केला जातो. महिलांना अशा प्रकरच्या अडचणींना सामोरे जाण्यास लागूनये यासाठी अनेक संस्था काम करतात आणि महिलांना आधार देतात. मात्र पुण्यातील घटनेनं काही पुरुषांना देखील कौटुंबीक जाचाला सामोरे जावे लागते हे समजते.

सदर घटना ही पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. संतोषकुमार कोरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीसह सासू -सासरे यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविना कोरे, रंजना इरले, दामोदर इरले, संग्राम इरले आणि गणेश दिवेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोषची पत्नी आणि तिच्या घरातील व्यक्तींनी अनेक वेळा संतोषकुमारचा प्रॉपर्टीवरुन मानसिक छळ केला. इतकचं काय तर या सगळ्यांनी मिळून संतोषच्या बँक खात्यातून पैसे काढले आणि परस्पर वाटून टाकले. प्रॉपर्टीवरुन झालेल्या वादाला कंटाळून संतोषने राहत्या घरी आत्महत्या केली असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नांदेडचा पारा पुन्हा वाढला, 41.02 कमाल तापमानाची नोंद

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे 'बुरे दिन' सुरु; दोन दिवसांत 47000 कोटी रुपयांचं नुकसान, १३ टक्क्यांनी शेअरची घसरण

Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Onion Export Reaction: कांदा निर्यातीच्या निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला फोडणी; कोण काय म्हणालं? Video

SCROLL FOR NEXT