Buldhana Crime News : २४ तासांपूर्वी बेपत्ता झाली होती ६ वर्षीय चिमुकली, जंगलातील भयंकर दृश्यानं चिखली हादरली

Budhana Crime News: बाळापूर येथील मूळ निवासी असलेले कुटूंब आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते.
Budhana Crime News
Budhana Crime Newssaam tv

>>संजय जाधव, साम टीव्ही

Little Girl Dead Body found in Buldhana: बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. चिखलीच्या तपोवनमध्ये घडलेलल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिखली तालुक्यातील तपोवन देवी मंदिर परिसरातून शुक्रवारी 6 वर्षीय चिमुकली हरवली होती. आज दुपारी मंदिरामागील परिसरातील तिचा मृतदेह आढळून आला आहे.

बाळापूर येथील मूळ निवासी असलेले कुटूंब आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून ती हरवली होती. तिचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.

Budhana Crime News
PM Narendra Modi Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन! लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्या शुभेच्छा

आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तपोवन देवीच्या मंदिर परिसरातील मागील भागात तिचा मृतदेह आढळून आला. चिमुकलीचा चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आलेला दिसत होता. अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Breaking News)

Budhana Crime News
Karnataka Election Result 2023: ज्या राज्यातील भाषणामुळे खासदारकी गेली, तिथेच राहुल गांधींनी दिला भाजपला दणका

मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून 500 मीटर अंतरावर हा मृतदेह सापडला. शनिवारी दुपारी जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी संपूर्ण मंदिर परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. तिची हत्या कोणी आणि का केली हे अद्याप कळू शकले नाही. या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com