Karnataka Election Result 2023: ज्या राज्यातील भाषणामुळे खासदारकी गेली, तिथेच राहुल गांधींनी दिला भाजपला दणका

Karnataka Election Result 2023: सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळालं आहे.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023Saam TV
Published On

Karnataka Election Result 2023: सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळालं आहे. हिमाचल प्रदेशनंतर आता काँग्रेसने कर्नाटकमध्ये विजय मिळवल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, ज्या राज्यातील भाषणामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली. त्याच राज्यात त्यांनी भाजपला मोठा दणका दिला आहे.

Karnataka Election Result 2023
PM Narendra Modi Tweet : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन! लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्या शुभेच्छा

कर्नाटक राज्यातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या भाषणातील विधानामुळे राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गमवावी लागली आहे. तसेच ६ वर्षांच्या निलंबनाला सामोरं जावं लागलं. मात्र राहुल यांनी त्याच राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. या विजयात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिवाय काँग्रेसचे अध्यक्ष देखील कर्नाटकमधीलच आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये 'मोदी' आडनावासंदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते. ज्यासाठी त्यांना मानहानीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर राहुल यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं. मात्र राहुल गांधी यांनी त्याच ताकदीने मैदानात उतरून भाजपशी दोन हात केले.

निवडणुकीपूर्वीच राहुल यांनी कर्नाटकात काँग्रेस १५० च्या जवळपास जागा जिंकेल असा दावा केला होता. त्यानुसार काँग्रेस आतापर्यंत १३६ जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे सत्तेवर असलेल्या भाजपला फक्त ६५ जागांवरच आघाडी घेता आली आहे. सत्ता असूनही भाजप कर्नाटकातील मतदारांची मने जिंकण्यास अपयशी ठरलंय.

Karnataka Election Result 2023
Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकातील विजय काँग्रेससाठी नवसंजीवनी, पण ही लाट थोपवावी लागेल!

काँग्रेसच्या विजयाची कारणे काय?

कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपविरोधात ४० टक्के कमिशनखोरीचा मुद्दा उचलला. प्रचारात हा मुद्दा अग्रस्थानी होता. मुख्यमंत्री बोम्मई यांचे सरकार ४० टक्के कमिशनचे सरकार असल्याचा आरोप केला. तर 'पे सीएम' नावाची मोहीम राबवली. यातून सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लोकांपर्यंत पोहचवली.

त्याचबरोब काँग्रेसने आक्रमक प्रचार केला. स्थानिक वॉर्डपासून ते सोशल मीडियापर्यंत काँग्रेसने जोरदार प्रचार केला. काँग्रेस नेत्यांनी या प्रचारात झोकून दिले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीदेखील बऱ्याच कालावधीनंतर एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित केले. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पायाला भिंगरी लावत अनेक ठिकाणी सभा घेतल्या.

याशिवाय काँग्रेसने निवडणुकीत आपला सगळ्या प्रचाराचा भर स्थानिक मुद्यांवर दिला. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, राहुल गांधींची अपात्रता, ईडी-सीबीआयची कारवाई यापेक्षा काँग्रेसने आपल्या प्रचारात रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्यांवर अधिक भर दिला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com