Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीचे भयंकर कृत्य; चार आरोपी जेरबंद

या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

रोहिदास गाडगे

पुणे - अनैतिक संबधाच्या संशयावरुन पतीनेच 30 वर्षीय पत्नीचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) चाकण औद्योगिक वसाहत परिसरातयेथे ही घटना घडली आहे. हत्या करून पतीने कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी चौघांना खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी चाकण पोलीसांनी अटक केली आहे. गोरक्ष देशमुख, रोशन भागात, देवानंद मनवर आणि बबन देखमुख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नवे आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चाकण परिसरात देशमुख कुटुंब नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होते. दरम्यान महिलेचा पती गोरक्ष देशमुख याला पत्नीचे बाहेर अनैतिक संबध असल्याचा संशय होता आणि याच संशयातुन पती गोरक्ष याने कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने पत्नीला रहात्या घरात गळफास देऊन तिचा खून केला. खुन करुन महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आळंदीफाटा येथील डोंगरावर मृतदेह जमिनीत पुरला. (Pune Latest Marathi News)

दरम्यान पत्नीच्या खुनाचा सुगावा न लागावा यासाठी पतीने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार चाकण पोलीसांत दिली होती. तपस सुरु असताना पतीनेच रहात्या घरात पत्नीचा खुन करुन तिचा मृतदेहाची जमिनीत पुरल्याचा उलगडा झाला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज? राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर

Crime: गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, बड्या राजकीय नेत्यासह १४ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT