Pune Koyta Gang News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : निवडणुका संपताच पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; नागरिकांना घरात घुसून मारहाण, वाहनेही फोडली

Pune Koyta Gang News : निवडणुका संपताच पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत घालण्यास सुरुवात केली आहे. हपसरमधील रामटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

Satish Daud

निवडणुका संपताच पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत घालण्यास सुरुवात केली आहे. हपसरमधील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांनी रविवारी (ता. ९ जून) रात्री चांगलाच धुमाकूळ घातला. हातात कोयते घेऊन या गुंडांनी नागरिकांना थेट घरात घुसून बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची देखील तोडफोड केली.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोयता गँगच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत.

गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला की नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवत कोयता गँगच्या गुंडांचा चांगलाच बंदोबस्त केला होता. हातात कोयते घेऊन रस्त्यावर धुमाकूळ काढणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली होती.

इतकंच नाही, तर गंभीर गुन्हे असलेल्या गुंडांना तडीपार देखील करण्यात आलं होतं. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात वचक बसला होता. आता निवडणुका संपल्यानंतर शहरात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास रामटेकडी परिसरात टोळक्याने दहशत माजवली.

त्यांनी घरात घुसून नागरिकांवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत काहीजण जखमी झाले. इतक्यावरच न थांबता या गुंडांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. सात ते आठ मुलांच्या टोळक्याने दहा ते बारा गाड्यांचं नुकसान केलं या संदर्भात स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT