Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात गुंडांची दहशत! अरण्येश्वर भागात 10 ते 15 वाहनांची तोडफोड; घरांवरही दगडफेक

यावेळी टोळक्याने घरांवरही दगडफेक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात मारामारीच्या, वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच पुण्यातील अरण्येश्वर भागात अशीच एक घटना समोर आली असून टोळक्यांकडून १५- २० वाहनांची तोडफोड केल्याचे उघडकीस आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune Crime) तोडफोडीच्या घटनांचे सत्र अद्याप सुरूच आहे. पुण्यातील अरण्येश्वर भागात असाच प्रकार समोर आला असून मध्यरात्री टोळक्याकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ( Pune Darshna Pawar Case Update)

तसेच टोळक्याने यावेळी घरांवरही दगडफेक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वीच असाच धक्कादायक प्रकार घडला होता. शहरातील तळजाई परिसरातील वनशिव वस्तीमध्ये सात ते आठ जणांच्या गुंड टोळक्याने कोयते आणि हत्यारांनी दहशत माजवत रस्त्याच्या कडेला लावलेल्या २६ वाहनांची तोडफोड केली. मंगळवारी (ता. २०) पहाटे साडेतीन वाजता हा प्रकार घडला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT