Mumbai Rain News : मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलसाठ्यात वाढ, काय आहे सद्यस्थिती?

Water Level in dams : मान्सूनच्या जोरदार सरींना धरणसाठ्यात काहीशी वाढ झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateSaam TV
Published On

Mumbai News : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने मुंबईसह राज्यभर दमदार आगमन केलं. त्याआधी पाऊस कधी पडेल या चिंतेत सर्वजण होते. मुंबईतही तीच परिस्थिती होती. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. काही दिवस पुरेस इतकाच पाणीसाठी शिल्लक राहिला होता. मात्र मान्सूनच्या जोरदार सरींमुळे धरणसाठ्यात काहीशी वाढ झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शनिवारी-रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात सोमवारपर्यंत 1151 मिमी इतक्या वापरण्यायोग्य पाण्याची वाढ झाली आहे. यंदा मान्सून लांबल्याने मुंबईच नाही तर राज्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठी घट झाली. (Latest Marathi News)

Mumbai Rain Update
Rain Alert: राज्यात पुढील 2 दिवस अतिमुसळधार! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबईकरांना देखील जुलैअखेरपर्यंत पुरेस इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. मात्र २ दिवस झालेल्या पावसाने मुंबईकरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. सोमवारपर्यंत धरणांमध्ये 79056 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शनिवार-रविवारी अनुक्रमे 93.972 मिमी (25 जून), 95.123 मिमी (26 जून) पावसाची नोंद झाली आहे.(Mumbai News)

Mumbai Rain Update
Mumbai CCTV: मॅनहोलमध्ये उतरला, सफाई करताना अंगावरुन गेली कार, थरारक VIDEO समोर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची स्थिती

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा सोमवारी सकाळी 6.5 टक्क्यांवरून 6.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. तुळशी आणि विहार या दोन लहान तलावांमध्ये अनुक्रमे 133 मिमी आणि 88 मिमी पाऊस पडला. प्रमुख तलावांपैकी मोडकसागर तलावात 22 मिमी, तानसा 29 मिमी, मध्य वैतरणा 6 मिमी आणि भातसा 23 मिमी पाऊस पडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com