Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : मुंबईमधील फ्रॉड कॉल सेंटर पुणे पोलिसांनी केलं उद्ध्वस्त; लाखोंची उलाढाल उघडकीस

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : ऑनलाईन फ्रॉड आणि फेक कॉल मार्फत फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुण्यातील दत्तावाडी पोलीस मुंबईत दाखल झाले. इथे त्यांनी नागरिकांची फसवणूक करणारं एक कॉलसेंटर उद्ध्वस्त केलं आहे. यात ४० मोबाईसह ७ हार्ड डिक्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

बजाज फायनान्स कंपनीच्या नावाने फ्रॉड कॉल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) मुलुंडमध्ये असलेल्या कॉलसेंटरवर धाड टाकण्यात आली आहे. या कॉलसेंटरमध्ये ४३ कर्मचारी कार्यरत होते. सामान्य नागरिकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर कॉल केले जात होते. कोणतेही व्याज न आकारता तुम्हाला कर्ज मिळेल अशा ऑफर दिल्या जात होत्या. बजाज फायनान्स कंपनीचे नाव ऐकूण अनेक सामान्या नागरिकांची लुटमार करण्यात आली. अशात आता हे कॉलसेंटर बंदपाडले आहे.

पुण्यात (Pune) देखील एका व्यक्तीची अशीच फसवणूक करत लाखोंची फसवणूक झाली. त्यामुळे पुणे पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस या रॅकेटचा शोध घेत होते. शोध घेत असताना पुणे पोलीस मुंबईच्या मुलुंड येथील कॉलसेंटरपर्यंत पोहचले. या ४३ व्यक्तींनी मिळून आता पर्यंत लाखोंची उलाढाल केली आहे.

कंपनीकडून या कर्मचार्यांना एक स्किप्ट दिली जात होती. त्यात सांगितल्याप्रमाणे त्यांना ग्राहकाशी संभाषण करावे लागत होते. समोरील व्यक्तीला विविध ऑफर सांगून बोलण्यात गुंतवल्यावर कर्मचारी त्यांना एक लिंक पाठवायचे. या लिंकवर सर्व माहिती भरली की, लगेचच कोणत्याही व्याजा शिवाय कर्ज दिले जाईल. असे सांगितले जात होते. या फ्रॉड कॉलमुळे अनेक गरजू व्यक्तींना लाखोंचा गंडा घातला गेला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT