Pune News: पुण्यात रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल?; एक तास आधी पोहचावे लागणार रेल्वेसटेशनवर

प्रवाशांकडून आता पर्यंत १ लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे.
Pune News
Pune NewsSaam TV

Pune News: पुण्यातून तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.आता तुम्हाला रेल्वे स्टेशनवर एक तास आधी पोहचावे लागणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी रेल्वेच्या वेळेत पोहचत नाहीत. परिणामी रेल्वेच्या चेन खेचण्याचं प्रमाण वाढू लागलंय. याने रेल्वे वाहतूक ही विस्कळीत होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर एक उपाय शोधला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर एक तास आधीच रेल्वे (Railway) स्टेशनवर पोहचण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. यामुळे चेन खेचल्याने होणारा त्रास रोखण्यास मदत होईल. तेसच इतर प्रवाशांचा खोळंबा होणार नाही. अनेक प्रवाशी वोळेत रेल्वे स्टेशनवर पोहचत नाहीत. त्यामुळे त्यांची सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी ते चेन खेचतात. असे केलेल्या प्रवाशांकडून आता पर्यंत १ लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे.

Pune News
Pune News: हृदयद्रावक! शॉक लागून बाप-लेकासह चार जणांचा मृत्यू

चेन खेचल्याने प्रवाशांना झाली अटक

जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान चेन खेचण्याच्या ११६४ घटना घडलेल्या आहेत. यात ९१४ प्रवाश्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात (Court) हजर केलं असता त्यांच्याकडून १ लाख ८० हजारांचा दंड ही वसूल करण्यात आलाय. यात तुरुंगवासाच्या शिक्षेची ही तरतूद आहे.

Pune News
Vande Bharat Train: नागपूरहून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, चार दिवसांपूर्वीच ट्रेन सेवा सुरु

रेल्वे चेन खेचण्याचे नियम

जर एखादे लहान बाळ किंवा ६० वर्षांवरील व्यक्तीने रेल्वे सुटल्यावर किंवा चुकून त्या व्यक्ती खाली राहिल्यावर चेन खेचू शकतात.

ट्रेनमध्ये आग लागल्यावर तुम्ही चेन खेचू शकता.

अचान कुनाची तब्येत खराब झाल्यास.

ट्रेनमध्ये चोरीच्या घटना घडल्यास तुम्ही चेन खेचू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com