Mumbai Measles : मुंबईकरांनो लहान मुलांची काळजी घ्या; गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्यामुळे काही भागात नागरिकांमध्ये भीती

दिवसभरात १० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ४८२ वर पोहोचली आहे.
Measles
Measles Saam TV
Published On

Measles Outbreak : मुंबईत गोवर बाधित रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. गुरुवारी दिवसभरात १० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ४८२ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये गोवरची चिंता कायम राहणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईत गुरुवारी ३२ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयित रुग्णांची संख्या ५ हजार ४९ वर पोहोचली आहे. तर तीन रुग्ण वेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Measles
Car Fire On Samriddhi Highway: नव्या-कोऱ्या समृद्धी महामार्गावर बर्निंग कारचा थरार; धावत्या कारनं अचानक घेतला पेट, पाहा Video

मुंबईत गोवरचा धोका कायम राहिला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गोवर बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप कायम राहिली आहे.

९ महिने ते ५ वर्षाच्या ४४,५६३ मुलांचे लसीकरण पूर्ण

९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ६६ आरोग्य केंद्रातील एकूण २३५८७८ बालकांपैकी ४४५६३ (१८.८९ टक्के) बालकांना आजपर्यंत गोवर रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात आली.

६ महिने ते ९ महिने वयोगटातील २१ आरोग्य केंद्रातील ज्या ठिकाणी ९ महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर पॉझिटीव्ह रूग्णाचे प्रमाणे १० टक्के पेक्षा जास्त आहे.

अशा आरोग्य केंद्रातील एकूण ५२९३ बालकांपैकी १२७० (२३.९९ टक्के) बालकांना आजपर्यंत गोवर रूबेला लसीची अतिरिक्त मात्राबदेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Measles
Sangli : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवारांनी गाठला अंधश्रद्धेचा कळस

गुरुवारी दिवसभरात रुग्णांची नोंद

दिवसभरात ३१ रुग्णांना डिस्चार्ज

रुग्ण उपचारासाठी दाखल - ३५

एकूण घरांचे सर्वेक्षण - ८५ लाख ३९ हजार ३८५

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com