Fighting Over Petrol Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : 'आधी मला पेट्रोल भरू दे...' तरूणांची एकमेकांना कुटाकुटी; पंपावरील राडा सीसीटीव्हीमध्ये कैद, VIDEO

Fighting Over Petrol at petrol pump in Hadapsar : हडपसरमध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी झाल्याचं समोर आलंय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये गुंडागर्दीचे वाढते सत्र दिसत आहे. दिवसाढवळ्या भरचौकात, वर्दळीच्या ठिकाणी राडा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुन्हा हडपसरमधून समोर आलीय. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून वाद झाला, अन् दोन जणांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केलीय. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे समोर आलीय.

पेट्रोल भरण्यावरून वाद

या घटनेमध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव नितेश गुप्ता, असं (Pune Crime News) आहे. पुण्यातील पेट्रोल पंपावरील मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावर ही धक्कादायक घटना घडलीय. 'रांगेत न उभे राहता आधी मला पेट्रोल भरू दे' अशी धमकी देत तरूणाला मारहाण केल्याचं समोर आलंय.

तरूणांची एकमेकांना कुटाकुटी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. दरम्यान, त्याच ठिकाणी २ जण त्यांची दुचाकी घेऊन त्या तरुणाच्या पाठीमागे येऊन (Crime News) न थांबण्याऐवजी त्यांनी त्याला "आधी मला पेट्रोल भरू दे" अशी दादागिरी (petrol pump) केली. यावरच न थांबता त्या तरुणांनी त्याची कॉलर पकडत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्या ठिकाणी दहशत माजवली. ही सगळी घटना सीसीटीव्ही मद्ये कैद झालीय.

पंपावरील राडा सीसीटीव्हीमध्ये कैद

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरूण दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पंपावर रांगेत उभा (Fight video) आहे. पाठीमागून आलेले दोघेजण त्याच्याशी काहीतरी बोलत त्याला धक्काबुक्की करतात. दोघे मिळून त्या तरूणाला मारहाण करतात. या घटनेमुळे पेट्रोल पंपावर मोठा गोंधळ उडाला होता. पेट्रोल भरण्यावर तरूणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना व्हायरल होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT