Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Fight Over Dog: कुत्र्याच्या कारणावरून भांडण; महिनाभरानंतर तरुणांनी केला कोयत्याने हल्ला

Pune Crime News: कुत्र्याच्या कारणावरून भांडण; महिनाभरानंतर तरुणांनी केला कोयत्याने हल्ला

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : महिनाभरापुर्वी कुत्र्याच्या कारणावरून दोघांमध्‍ये भांडण झाले होते. हा राग मनात ठेवून वचपा (Pune) काढायच्‍या उद्देशाने ३ ते ४ जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला केला. डोक्‍यात कोयत्‍याने वार केला. यात सदर तरूण गंभीर जखमी झाला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील कात्रज भागातील ही घटना आहे. हा सगळा प्रकार बुधवारी (२१ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. फिर्यादी यश कदम (वय १७) हा त्याच्या मित्रांसोबत कात्रज भागात मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी त्याचा ओळखीचा तरुण ओंकार दानवले हा त्याच्या साथीदारांना घेऊन यशकडे जाऊन त्याला शिवीगाळ केली. तसेच एक महिन्यांपूर्वी त्यांच्या दोघात कुत्र्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा (Crime News) राग मनात ठेऊन ओंकारने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने यशच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

डोक्याच्या उजव्या बाजूला वार झाल्यामुळे यश तिथेच खाली पडला. यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. १ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन तरुणांनी कृत्य केले आहे. यश कदम याने भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणी ओंकार दानवले, यश घोडके, राज जगताप, सुजल चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT