Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती झाला हैवान; खलबत्याने मारहाण करत दिले गरम हिटरचे चटके

Crime News : सदर घटनेत नराधम पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. आता देखील कौटुंबीक हिंसाचाराची एक मोठी घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला क्रूर वागणूक दिली आहे. सदर घटनेत नराधम पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. पती घरी नसताना पत्नी आपल्या मुलीचा फोन पाहत होती. फोन पाहत असताना अचानक तिथे तिचा पती आला. आपली पत्नी इतर कोणत्या व्यक्तीशी फोनवर बोलत आहे असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने पत्नीला ओरडण्यास सुरुवात केली. तसेच तो तिला बेडरुममध्ये घेऊन गेला.

पत्नीला दिले गरम हिटरचे चटके

सदर घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. पत्नीला बेडरुममध्ये नेल्यावर पतीने तिला बेदम मारहाण केली. तू फोनवर कोणाशी बोलत होती असा प्रश्न विचारला. त्यावर मी कोणाशीही बोलत नव्हते फक्त फोन पाहात होते. असे पत्नीने सांगितले. मात्र डोक्यात संशय घेऊन पतीने तिल्या हिटरचे चटके दिले. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही. नंतर त्याने पीडितेच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण केली.

पीडितेला यामध्ये मोठी दुखापत झाली आहे. घटनेनंतर तिने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

Face Care: चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्याने चेहरा फक्त ग्लो होत नाही तर 'हे' त्रासही होतात कायमचे दूर

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

SCROLL FOR NEXT