Crime News : दुर्दैवी घटना! चहा विकून मुलाचं शिक्षण पूर्ण केलं; खर्चाला पैसे न दिल्याने मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar Crime News: आपल्या वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने तरुणाने रागाच्या भरात आपलं जीवन संपवलं आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

नवनीत तापडिया

Chh. Sambhajinagar Crime News : प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या जिवाचं राण करतात. मुलाने चांगले शिक्षण घ्यावे त्याला काही कमी पडू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र काही मुलं आपल्या आई बाबांचे हे ऋण समजून न घेता छोट्या मोठ्या कारणांवरून टोकाचं पाऊल उचलतात. छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांनी खर्चासाठी पैसे न दिल्याने तरुणाने रागाच्या भरात आपलं जीवन संपवलं आहे. (Chhatrapati Sambhajinagar)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चहाची टपरी चालवून वडिलांनी मुलाला एमजीएम संस्थेत ॲनिमेशनचे शिक्षण दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाने नोकरीचा शोध घेत रहावा आणि आपल्या पायांवर उभं रहावं असं त्यांना वाटत होतं. मात्र मुलगा दिवसभर बाहेर भटकायचा. सुरुवातीला त्याने नोकरीचा शोध घेतला मात्र त्याला हवी तशी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे नंतर त्याने नोकरीचा शोध थांबवला.

Crime News
Mumbai Crime: विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक! दोघांना अटक, मेघवाडी पोलिसांची कारवाई

नोकरी नसल्याने तो अद्यापही वडिलांच्या जीवावर अवलंबून राहात होता. त्याचा सर्व खर्च त्याचे बाबा करायाचे. आपले वडील आपला सर्व खर्च करत आहेत त्यामुळे त्याने स्वत: काही पैसे कमवण्याकडे लक्ष दिले नाही. अशात कालही त्याने बाबांकडे पैशांची मागणी केली. मात्र वडिलांनी नकार देताच त्याला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भराच बेडरूममध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुकुंदवाडी परिसरातील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीये. मुलाच्या अशा निर्णयामुळे त्याचे वडील खचून गेले आहेत.

Crime News
Shirdi Crime News : बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भाऊ खवळला; रागाच्या भरात केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com