Crime News : शिर्डीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. बहिणीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने भावाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सदर घटनेत आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. (Crime News)
मिळालेल्या महितीनुसार, ज्ञानेश्वरी कुलथे असे मयत तरुणीचे नाव आहे. आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध समजल्यावर भाऊ आणि तिच्यात बराच वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने निर्दयी भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची विचित्र पद्धतीने हत्या केली आहे. त्याने बहिणीच्या डोक्यात थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक टाकला. यात १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय.
काल रात्री आठच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे. आरोपी भावाला शिर्डी (Shirdi) पोलिसांनी येवला येथून ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, ९ महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करत शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. त्रिपुरातील आगरतळा येथे ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तनुजा बेगम असे या मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तसेच आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृतदेहाचे तुकडेही जप्त केले आहेत.
घरामध्ये रक्ताचे डाग आढळल्याने तनुजाच्या आईला संशय आल्याने त्यांनी आरडा ओरडा केला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कायम पतीचा शोध सुरु करत त्याला अटक केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.