Pune Doctor Attack On Young Man Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात कोयत्याची दहशत कायम, डॉक्टरने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; पाहा VIDEO

Pune Doctor Attack On Young Man: पुण्यातल्या वाघोलीमध्ये डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. विवेक गुप्ता असं या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरकडून तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत न दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये (Pune) कोयत्याची दहशत कायम आहे. पुण्यात कोयता गँगमुळे (Pune Koita Gang) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये आता एका डॉक्टरने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या वाघोलीमध्ये डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केला. विवेक गुप्ता असं या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरकडून तरुणाने व्याजाने पैसे घेतले होते. हे पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टरने आपल्या दोन साथीदारांसोबत तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात प्रितेश बाफना हा तरुण जखमी झाला. या डॉक्टरचे पुण्यामध्ये जीवन रक्षक नावाचे हॉस्पिटल आहे.

कोयता हल्ला केल्यानंतर प्रितेश बाफना या तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या दोन साथिदारांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या हल्ल्याचा तपास लोणीकंद पोलिस करत आहेत. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात डॉक्टरने कोयता हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

डॉ. विवेक गुप्ताने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रितेश बाफनाच्या कारवर दगड मारून तोडफोड केली. लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला जखमी केले. तसंच, डॉक्टरने प्रितेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांना देखील शिवीगाळ केली होती. दरम्यान, 'डॉक्टर विवेक गुप्ता हा व्याजाचा धंदा करतो. व्याजाच्या पैशांची वसुली करण्यासाठी डॉक्टरने गुंडांना कामाला ठेवले आहे.' असा आरोप फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT