Bopdev Ghat Saam Tv
मुंबई/पुणे

Bopdev Ghat Case : ती भयाण काळरात्र...बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार, नराधमांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली; अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Priya More

सागर आव्हाड, पुणे

बोपदेव घाटातील टेबलपॉईंटवर मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर ३ नराधमांनी चार वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी पुण्यात घतली. रात्री १२ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत हैवान झालेले नराधम तिच्या शरीराचे लचके तोडत होते. जीवाच्या अकांताने टाहो फोडत तरुणीने या नराधमांना विरोध केला. मात्र मित्राला ठार मारण्याची भीती दाखवून तिला देखील तिघांनी मारहाण केली. त्यानंतर नराधमांनी तिच्यासोबत माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य केले.

या घटनेला ३ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर देखली अद्याप पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. डोंगराळ भाग, मोबाईल रेंज, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव अशा विविध समस्यांमुळे पोलिसांना देखील तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येते. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, कोंढवा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना आहे. तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी रात्रीचे पावणे अकरा वाजले असतील. दोघे टेबल पॉईंटवर फिरत होते. १५ मिनिटानंतर तिघे नराधम तिथे आले. एकाच्या हातामध्ये लाकडी बाबू, दुसऱ्याच्या हातात कोयता तर तिसऱ्याच्या हातात चाकू होता. तिघांनी तरुणीच्या मित्राला तू एवढ्या रात्री इथे काय करतो असं म्हणून मारहाण करण्यास सुरूवात केली. तरुणीला देखील एवढ्या रात्री मुलासोबत काय फिरतेस असे म्हणत धमकावले. यानंतर तरुणीकडील दागिणे काढून घेतले. पुढे तरुणी आणि तिच्या मित्राला काही अंतरावर पठाराच्या उताराच्या दिशेने घेऊन गेले.

तरुणीच्या मित्राला तिघांनी परत शिवीगाळ केली. तर तरुणीला लाकडी बांबूने मारले. कोयता हातात घेतलेल्या नराधमाने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तिच्या मित्राचे हात शर्टाने बांधून पाय बेल्टने बांधले. मित्राला मारहाण केली. यानंतर कोयता हातात असलेल्या नराधम तरुणीला टेबल पाईंटच्या खालील बाजूस घेवून गेला. तरुणीने त्याला विरोध करत तुम्हाला काय बोलायचे ते इथेच बोला असे म्हटले. तरी देखली त्याने तरुणीला जबरदस्तीने खाली ओढले. तरुणीसोबत त्याने बळजबरी करण्यास सुरूवात केली. तरुणीने विरोध केला. त्यावेळी त्या नराधमाने तिच्या मित्रांना मारून टाकण्यास सांगेल अशी धमकी दिली.

तरुणी जीवाच्या अकांताने टाहो फोडत होती. मात्र डोक्यात सैतान संचारलेल्या त्या नराधमाने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले. तरुणी प्रत्येकवेळी त्याला विरोध करत होती. मात्र तो सतत तिच्या मित्राला मारून टाकण्याची धमकी देत होता. तरुणी हात जोडून त्यांना आम्हाला सोडून देण्याची विनंती करत होती. मात्र त्यानंतर देखील दुसऱ्या नराधमाने तिच्यासोबत अत्याचार केला. त्यानंतर हातात चाकू असलेल्या तिसऱ्या नराधामाने देखील हेच कृत्य केले. यानंतर पहिल्या नराधमाने तरुणीवर अत्याचार केला. तिघांनी तरुणीसोबत बलात्काराबरोबरच अनैसर्गिककृत्य देखली केल्याचे पुढे आले आहे.

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कोयताधारी नराधम तिला मित्राजवळ घेवून आला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला आम्ही जीवे मारू अशी धमकी दिली. आम्ही जोपर्यंत तुम्हाला आवाज देत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडायचे नाही जागेवरच थांबायचे असे सांगितले. वेदनेने व्हिवळत, मित्रासोबत तरुणी तिथेच थांबली. जवळपास १५ मिनिटं दोघे तसेच थांबून होते. काही वेळानंतर तरुणीने मित्राचे हात-पाय बांधलेले सोडले. यानंतर तरुणी आपल्या घरी आली. तिच्यासोबत झालेला प्रकार बहिणीला सांगितला. पुढे तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पावर गटात केला प्रवेश

Maharashtra News Live Updates : मध्यप्रदेशच्या रतलामवरून मुंबईला येणारा मोठा अफूचा साठा जप्त

Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Tata Group : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला; नाव आलं समोर

Bopdev Ghat Case : ७०० पोलीस, ७०० CCTV अन् ८० किमीपर्यंत धागेदोरे; असा सापडला पोलिसांना चकवा देणारा बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी

SCROLL FOR NEXT