Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! लग्नात नाचताना झाला वाद, पुण्यात ४ जणांकडून तरुणावर कोयत्याने वार; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाच्या वरातीत नाचताना झालेल्या वादावरुन चौघांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे

Pune Crime: पुण्यामध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. पुण्यातील हडपसरमध्ये अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये लग्नाच्या वरातीत नाचताना झालेल्या वादावरुन चौघांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

याबाबत तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी तरुण हा सोलापूर जिल्ह्यात जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नासाठी गेला होता. लग्नावेळी फिर्यादी तरुण आणि यातील मुख्य आरोपी अमरदिप जाधव हे दोघे ही नाचत होते. यावेळी लग्नात नाचताना त्यांच्यात वाद झाला. या वादाचा राग जाधव याच्या डोक्यात होता.

हाच राग मनात ठेवून पुण्यात १५ जानेवारी रोजी जाधव याच्यासह तीन जणांनी फिर्यादी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याला हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली आणि तिथून पसार झाले.

याबद्दल तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सागर सुकळे (२२) याच्यासह ३ अनोळखी तरुणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहेत. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मोठी बातमी! एकनाथ शिंदें आज परभणी दौऱ्यावर, मनोज जरांगेंनी दिला इशारा

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

SCROLL FOR NEXT