Chandan Nagar Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; डोळ्यावर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी नेलं, सैफवर गुन्हा दाखल

22 Year Old Girl Missing From Pune: पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Crime News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या तरुणीला सैफ नामक तरुणाने लग्नाचं वचन देऊन पळवून नेल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी पेईंग गेस्टमध्ये (Pune News) राहत होती. या तरुणीचे एका सैफ नामक व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. आरोपी सैफ याने लग्न करण्याचं वचन देत तिला पळून नेले. परंतु पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे तिच्या लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या तरुणीने आपल्या मैत्रिणीला फोन केला. "सैफने माझ्या डोळ्याला पट्टी बांधून (Crime News) अनोळखी ठिकाणी आणले असून याठिकाणी बरेच लोक आहेत, मी तुम्हाला गुपचूप लोकेशन पाठवत आहे" असे सांगून तिने मैत्रिणीला नोएडा दिल्ली येथील लोकेशन पाठवले.

मात्र, अद्याप सुद्धा बेपत्ता झालेली तरुणी परतलेली नाही. ही बाब लक्षात येताच तिच्या मैत्रिणीने तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी (Police) आरोप सैफ नामक तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे 3 उमेदवार आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT