Lonikand Police, Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या, समलैंगिक संबंधातून हत्येचा पोलिसांना संशय

Pune Crime News : पोलिसांनी आरोपींच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. वाघोली येथील एका महाविद्यालय मध्ये तो शिकत होता आणि एका होस्टेलमध्ये राहत होता. महेश असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर तातडीने जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तरुण बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. (Pune News Update)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ही हत्या समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा अजूनही शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी आरोपींच्या शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत प्रेमसंबधास नकार दिल्याने तरुणीवर ब्लेड हल्ला

मुंबईत प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर ब्लेड हल्ला करण्यात आला आहे. काळाचौकीच्या मिलन इंजस्ट्रीजवळ मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरुणीला उपचाराकरिता केईएम रुग्णालयात दाखल केलं आहे. तर हल्यातील आरोपी समीर राऊत याच्यावर पोलिसांनी कलम ३०७,५०४,५०,६ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

IND vs SA: रांची वनडेपूर्वी धोनीच्या घरी पोहोचला विराट; स्वतः माहीने चालवली कार

Kitchen Hacks : मीठाच्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

Ticket Scam Alert : उच्च शिक्षित दांपत्याला हुशारी पडली महागात! ‘AI’ चा गैरवापर करून बनावट एसी लोकल पास बनवला अन्...

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

SCROLL FOR NEXT