Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : घरात घुसला, फोन हिसकावला अन्...; पुण्यात गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Pune News : पुण्यात गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून एका १४ वर्षीय मुलीवर विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गॅस सिलिंडर करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल झाल आहे.

Yash Shirke

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी १९ वर्षीय डिलिव्हरी बॉय पीडित मुलीच्या घराजवळ आला होता. पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून आरोपीने तिच्यावर विनयभंग केला. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास बघून घेईन अशी धमकी देखील आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला दिली.

गॅस सिलिंडर घरी देण्यासाठी आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करुन तिच्याशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने पीडितेला धमकावून तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिच्या मोबाईलवरुन स्वत:च्या मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला बघून घेईल अशी धमकी आरोपीने दिली.

पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गॅस सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे लोक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT