Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Crime : शर्टने गळा आवळला, हात बांधले, टॉवेलने तोंड झाकलं; शुल्लक कारणावरुन तरुणाची निर्घृण हत्या

Pune News : शुल्लक कारणावरुन एका ३५ वर्षीय तरुणाचा त्याच्याच मित्रांनी खून केला. शर्ट आणि टॉवेलने तरुणाचा गळा आवळला. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

Pune : पुण्यातील मुळशी येथे फिरण्यासाठी एक ३५ वर्षीय तरुण त्याच्या मित्रांसह गेला होता. फिरत असताना या तरुणाचा मित्रांशी वाद झाला. वादाचे स्वरुप हाणामारीत झाले. पुढे कारमध्ये बसलेले असताना चार मित्रांनी या तरुणाचा गळा आवळून हत्या केली. आरोपींनी तरुणाचा मृतदेह जंगलात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या विरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्यावरुन गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हानिफ अली सहाजमाल शेख उर्फ सोनू हा रायगडच्या खालापूर तालुक्यातील आजिवली गावचा रहिवासी होता. सोनू त्याच्या चार मित्रांसह मुळशी येथे फिरण्यासाठी गेला होता. मुळशीमधील एका गोशाळेच्या शेडमध्ये सोनू आणि त्याचा मित्र आशिष यांच्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाला. दोघांनी लोखंडी हातोडीने एकमेकांनी मारहाण केली. गोशाळेत हाणामारीनंतर सर्वजण कारमध्ये बसले.

त्याच दिवशी दुपारी एकच्या सुमारास कारमध्ये चारही मित्रांनी मिळून सोनूवर हल्ला केला. टॉवेल आणि शर्ट याचा वापर करुन सोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर सोनूचा मृतदेह लोणावळ्याजवळ असलेल्या दुधीवरे गावाच्या खिंडीमधील जंगलामध्ये फेकून दिला. सोनू घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने वावोशी पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी शुभम यादव, अमर मोरे, आशिष चव्हाण आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आरोपी शुभम यादवने दिलेल्या माहितीच्या आधारे सोनूचा मृतदेह शोधून काढला. दुधीवरे गावालगतच्या जंगलात हा मृतदेह झाडीत आढळला. त्याचे कपड्याने बांधलेले होते. ज्या शर्टाने सोनूचा गळा आवळला होता, तो शर्ट त्याच्या शरीरावर होता. तसेच त्याच्या तोंडावर टॉवेल देखील होता. पोलिसांनी सोनूचा मृतदेह ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: जरांगे परत का आले? मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षणाचा चेंडू शरद पवारांनी केंद्राकडे टोलावला

... तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार, शरद पवारांनी दिले तामिळनाडूचे उदाहरण

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून विसर्ग; गोदावरी नदी तुडुंब, दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकरी आणि गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT