Pune Crime News  saam Tv news
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! तरुणावर प्राणघातक हल्ला, कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

Pune Police: पुण्यामध्ये शिवाजीनगर न्यायालयाबाहेर तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ४ ते ५ तरुणांनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले.

Priya More

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर एका तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंदार मारुती किवळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मंदार कात्रज परिसरातील असून तो आर्थिक व्यवहारातून झालेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपी आहे. ३ दिवसांपूर्वी मंदार कारागृहातून बाहेर आला होता. न्यायालयीन कामासाठी तो आला असता त्याच्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. या हत्याकांडाच्या घटनेमुळे पुणे हादरले.

२० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या आणि आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मंदार किवळे या हत्याकांड प्रकरणातील आरोपी आहे. याच प्रकरणातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ला प्रकरणात कात्रज येथे राहणारा अक्षय चव्हाण हा प्रमुख आरोपी असल्याची माहिती आहे. अक्षय चव्हाणच्या भावाची २ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. आज हल्ला झालेला मंदार किवळे हा देखील या प्रकरणातील आरोपी आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे.

अक्षय चव्हाणने हल्ला करण्यासाठी १० ते १५ तरुणांना सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेले तरुण रात्रभर आंबेगाव परिसरात थांबले होते. हल्ल्याचे नियोजन करून त्यांनी न्यायालय परिसरात मंदारवर हल्ला केला. आरोपींनी आधी मंदारच्या दिशेने गोळीबार केला. पण त्याला गोळी न लागल्यामुळे नंतर त्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ला प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दुपारी १.१५ वाजता शिवाजीनगर न्यायालयाच्या आवाराबाहेर मंदार किवळे या पीडित व्यक्तीवर ४ हल्लेखोरांनी हल्ला केला. पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त धारदार शस्त्राने जखमा झाल्या आहेत. संशयितांची नावे ओळखण्यात आली आहेत. घटनास्थळावरून दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पथके कार्यरत आहेत. जखमी मंदारच्याविरोधात २०२५ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

Goa Trip : गर्दी नको, फक्त निसर्गाचा आनंद! गोव्यातील 'ही' ५ ठिकाणे विकेंड ट्रिपसाठी ठरतील खास

Atal Pension Yojana : बँकेत खाते असेल तर ही बातमी वाचाच! दरमहा मिळणार ५ हजार रुपये

Fashion Tips : कमी उंचीची चिंता सोडा! हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या 5 फॅशन ट्रिक्स

Maharashtra News Live Update: शिवाजीनगर न्यायालयासमोरील हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन

SCROLL FOR NEXT