Goa Trip : गर्दी नको, फक्त निसर्गाचा आनंद! गोव्यातील 'ही' ५ ठिकाणे विकेंड ट्रिपसाठी ठरतील खास

Shreya Maskar

गोवा

गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर गजबजलेले समुद्रकिनारे, बीच पार्टी आणि पर्यटकांची गर्दी येते. मात्र गोव्यात अशी काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवता येतो. हिवाळ्यात फिरण्यासाठी ही ठिकाणं उत्तम पर्याय ठरू शकतात.

Goa | pinterest

गालजीबाग बीच

गोव्यातील तुलनेने शांत आणि कमी विकसित समुद्रकिनाऱ्यांपैकी गालजीबाग बीच एक आहे. किनाऱ्यावरील स्वच्छ वाळू, नारळाची झाडे आणि निळाशार समुद्र मनाला प्रसन्न करतो.

Galjibag Beach | pinterest

बटरफ्लाय बीच

डोंगर आणि हिरव्यागार जंगलाने वेढलेला बटरफ्लाय बीच गोव्यातील सुंदर आणि निवांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे पोहोचण्यासाठी प्रामुख्याने बोट किंवा पायवाटेचा पर्याय निवडावा लागतो. बोटीतून जाताना समुद्रातील डॉल्फिन पाहण्याची संधीही मिळू शकते.

Butterfly Beach | pinterest

नेत्रावली वन्यजीव अभयारण्य

समुद्रकिनाऱ्यांपेक्षा जंगल आणि हिरवळ आवडत असेल तर नेत्रावली अभयारण्याला भेट द्या. घनदाट जंगल, निसर्गरम्य पायवाटा आणि जैवविविधतेमुळे हे ठिकाण खास आहे. येथील बुडबुड्यांची तळी म्हणजेच 'बुडबुड्याची तळी' हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

Netravali Wildlife Sanctuary | pinterest

दिवर बेट

मांडवी नदीच्या परिसरातील दिवर बेट गोव्याच्या शांत आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील हिरवीगार शेती, जुन्या पोर्तुगीज शैलीतील घरे आणि गावातील निवांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. निसर्ग, फोटोग्राफी आणि शांत फेरफटक्यासाठी हे ठिकाण छान आहे.

Divar Island | pinterest

पाटणेम बीच

पाटणेम बीच हा दक्षिण गोव्यातील तुलनेने शांत समुद्रकिनारा आहे. येथील लांब पसरलेली वाळू, नारळाची झाडे आणि सुंदर सूर्यास्त पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्रकिनाऱ्यावर निवांत फिरणे, योगाभ्यास करणे किंवा शांतपणे वेळ घालवणे असे अनुभव घेता येतात.

Patnem Beach | pinterest

गोव्याला कसं जाल?

मुंबईहून कोकण रेल्वेमार्गे गोव्याला जाता येते. मडगाव, थिवीम, करमळी किंवा पेरनेम यांसारख्या स्थानकांवर उतरून पुढे इच्छित ठिकाणी जाता येते. प्रवासाला साधारण ८ ते १२ तास लागू शकतात.

How to go to Goa? | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : कामाच्या धावपळीतून ब्रेक घ्या! बदलापूरमधील 'या' ६ ठिकाणी विकेंडला फिरायला जा

Badlapur Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...