विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

Pune Crime: अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून; आरोपीला बिहारमधून अटक!

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

येरवडा : पुण्यातील (Pune) येरवडामध्ये अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून करून पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी बिहार (Bihar) येथे जाऊन अटक केली आहे. या खूनाच्या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद गुलाब मोहम्मद मुक्तार शेख (वय 32, रा. मूळचा बिहार, सध्या राहणार पठारे वस्ती लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News In Marathi)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी लोहगाव येथे एक महिला स्वतःच्या घरात बाथरूम मध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती विमानतळ पोलिसांना (Vimantal Police Station, Pune) देण्यात आली होती. संशयास्पदरित्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे विमानतळ पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात सदर महिलेचा अज्ञात इसमाने गळा आवळून खून केल्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला होता. (Yerawada Crime Pune)

आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक;

अधिक तपासात अनैतिक संबंधातून त्यांच्याच घरात पूर्वी राहणाऱ्या भाडेकरू इसमाने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपी इसम मोहम्मद मुक्तार शेख याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठविण्यात आले होते.

हे देखील पहा-

सापळा रचून बिहार मधून अटक;

तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मोहम्मद हा खून करून त्याच्या मूळ गावी बिहार येथे गेल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून बिहार येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासात अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून त्यानेच सदर महिलेचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT