पुणे: शिवसेनेचे उपनेता रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल! (पहा Video)

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत गर्भपात करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रघुनाथ कुचीकावर गुन्हा दाखल.
रघुनाथ कुचिक
रघुनाथ कुचिकगोपाल मोटघरे

अश्विनी जाधव केदारी, गोपाल मोटघरे

पुणेः शिवसेनेचे उपनेते आणि राज्य शासनाच्या किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जी) रघुनाथ कुचीक यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील दौंड येथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षापासून चोवीस वर्षांच्या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत पुणे आणि गोव्यात तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपी रघुनाथ कुचिक आणि पीडित तरुणी यांची ओळख 6 नोव्हेंबर 2020 पासून ते 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. त्यांचे सुरुवातीला ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्या तरुणीला आरोपी रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर शिवाजीनगर आणि अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले.

रघुनाथ कुचिक
Bhandara: पती आणि जाऊबाईचे अनैतिक सबंध पाहू न शकल्याने पत्नीने केली आत्महत्या...

पुढे मिळालेल्या माहितीनुसार, त्या दरम्यान ती तरुणी गरोदर राहिली. याबाबत आरोपीला माहिती मिळताच, पीडित तरुणीचा गर्भपात केला. याबद्दल तू कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी देखील दिली. हा घडलेला प्रकार पीडित तरुणीने पोलिसांना सांगितला. आरोपी रघुनाथ बबन कुचिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले आहे.

video-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com