Bhandara: पती आणि जाऊबाईचे अनैतिक सबंध पाहू न शकल्याने पत्नीने केली आत्महत्या...

दीपाली आत्महत्या प्रकरणी नवीन खुलासा, पोलिसांनी आरोपी पती आणि जाऊबाईला केली अटक
दीपाली गिरीपुंजे
दीपाली गिरीपुंजेअभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

गोंदिया: जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ठाणा गावातील 30 वर्षीय दीपाली मेहर या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली होती. चार महिन्याआधीच धर्मेंद्र मेहर आणि दीपाली यांचा गंधर्व विवाह झाला होता. मात्र दिपालीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप दिपालीच्या कुटंबीयांनी केला असून पोलिसांनी या घटनेला कारणीभूत असलेल्या पती धर्मेंद्र मेहर आणि दिपालीची जाऊबाई प्रीती मेहर या दोघांना अटक केली आहे. (Bhandara Crime News)

प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्या पहिल्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने धर्मेंद्र यांनी चारच महिन्याआधी दीपाली गिरीपुंजे या महिलेशी लग्न केले होते. मात्र पत्नीच्या मृत्यू नंतर धर्मेद्र आणि त्यांची वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहित झाल्यावर त्यातून होणारा मानसिक त्रास होत असल्याने दिपालीने आपल्या घरच्या मंडळीला देखील याची माहिती दिली होती.

दीपाली गिरीपुंजे
NFHS Report: दारू पिणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट, तर पुरुषांची संख्या...

चार दिवसाआधीच धर्मेंद्र हा दीपालीला तिच्या माहेरून घेऊन ठाणा गावात आला होता. दरम्यान दोघांमध्ये पुन्हा भांडण होत असल्याचे दिपालीने आपल्या माहेरी सांगितले होते. मात्र घरच्या मंडळीने दीपालीला फोन वर धीर दिला. त्यानंतर दीपालीला राग अनावर झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असून तिच्या कुटूंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.

हे देखील पहा-

तर या संदर्भात पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता मृत दिपालीच्या कुटूंबियां कडून नोंदविलेल्या पोलिसांनी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर आणि त्यांची वहिनी प्रीती मेहर याना अटक केली असून पुढील तपास पोलिश करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com